Wednesday, January 24, 2007

Shraawan Waat


अशी कशी ही एकटीच चालली
कुणाच्या ओढीनं ओढावून
ओली कच्च हिरवाळलेली
मिलनाच्या ओढीनं गाभुळलेली

जंगलाचा मंद सुगंध
श्वासात भिनवत
आंदोळत बहरत
वळणावर बहकत
हिरव्या श्रावणात हरवून गेलेली.