So Hum !!!
अंधाराचा समुद्र भवति
अमर्याद हा भरून राहिला
आणि समोरच नौका छोटी
नौकेमधला दिवा चमकला
नौक ती कि काय कळेना
झाडातील काजवा फडकला
फसवित फसवित पुढे चालले
तेजाचे ते निशाण मजला
निशाण फसवी मी ही हटेना
पाठलाग हा अखंड चाले
आणि एकदा असा अचानक
तो तेजाचा ध्वज पूर्ण दिसे मज
अशी अनावर होऊन मी ही
तेजोगम तो निरखून पाही
विस्मयतेने अचंबित मी
अशीच पाहि उभी ठाकुनी
धूसर प्रतिमा माझीच होती
तेजाच्या त्या ॐकारातून
0 Comments:
Post a Comment
<< Home