Thursday, April 20, 2006

Ayushya

पुसटतं आयुष्य म्हणजे कुणी आपलं वाटत नाही
थांबलेलं वाटलं तरी संपलं वाटत नाही
दुखत असलं खूप तरी दुखलं वाटत नाही
वर्षाव झाला अगदी तरी शिंपलं वाटत नाही
खोल खोल गेलं तरी रूजलं वाटत नाही
आपलं आपलं म्हणतानाच परकं वाटत रहातं
कितीही सांभाळलं तरी पोरकं वाटत रहातं
गडद गडद केलं तरी भुरकं वाटत रहातं
कुठेतरी चुकतंय असं सारखं वाटत रहातं

शोधावं म्हटलं तर मिळत नाही
जुळवावं म्हटलं तर जुळत नाही
पुसटतं आयुष्य...
म्हणजे काय ते कळत नाही.


2 Comments:

Blogger Abhijit Bathe said...

Hmmm!
This is a first for me!!
I have 'never' replied to a poem!
'jeeo'!

3:59 PM  
Blogger AJ said...

Uttam !

Mala comment kay dyawi te kalat nahi !

:)

3:22 AM  

Post a Comment

<< Home