Thursday, April 20, 2006

Punha Gulmohor...

गुलमोहोर आताशा गप्प गप्प असतो
कसा कुणास ठाऊक खिन्नसा दिसतॊ
वाटतं काय झालंय ते विचारावं...
पण मग त्याच्या प्रश्नांना उत्तर काय द्यावं

म्हाताऱ्या चरबट वडानं त्याला समजावलं होतं
कोपऱ्यातल्या सदाफुलीनं हसायला शिकवलं होतं

वडच आता पारंब्यांचे हात टेकून उभा आहे
सदाफुलीचा अवास आता घमघमायला लागलाय

गुलमोहोराला सावित्री नाही सत्यवानाची कथा नाही
तशी काही चिंता नाही मनाला कसली व्यथा नाही
तरीसुद्धा कुढत असतॊ, एकटाच वेडा वाढत असतॊ

बोलत नाही, फुलत नाही
वाऱ्यानं सुद्धा हलत नाही
पानगळ आता सुरू झालीय
त्याचं त्यालाच सांभाळायचंय
मला खूप काही सांगायचंय
एकदा भेटायला जायचंय.

3 Comments:

Blogger Global Desi . said...

Khupach chhan.

1:50 AM  
Blogger Global Desi . said...

Khupach chhan.

1:50 AM  
Blogger Global Desi . said...

Khupach chhan.

1:50 AM  

Post a Comment

<< Home