me, gulmohor...

मी, गुलमोहोर...
आमच्या बागेतल्या गुलमोहोराला
हिवाळ्यातच पालवी फुटली;
डावीकडची एक फांदी
अचानकच बहरून आली !
लालकेशरी पिवळ्या फुलांनी
लगडून जडावून गेली.
भर दुपारच्या कडक उन्हाच्या
वेडी प्रेमातच पडली
आणि सकाळचा गारठा सहन न होऊन
दोन फुलं गळून गेली.
मग ती वेडी हळवी फांदी
हिरमुसुन रडत बसली
आणि कोपऱ्यातली मंद अबोली
केशरीसं फिकट हसली.
मुसमुसत फांदी म्हणाली
मी का नाही सदाफुली?
ती कशी सदा असते सुखावलेली
तशी मी का नाही फुललेली?
रस्त्यापल्याडचा वड अनुभवी खरखरला...
"अगं, प्रत्येकाचा वेगळा काळ असतो आपला.
मी नेहेमी हिरवा असतो
तरीसुद्धा भकास दिसतो
पारंब्यांच्या चरबट आयाळींनी लगडलेला
बारा महिने उभा असतो
वर्षातून एकदाच पुजला जातो
सावित्रीच्या कृपेनं...
जखडून जातो त्यादिवशी
पांढऱ्या धाग्यांच्या वेटोळ्यानं
त्यातसुद्धा सुख असतं
प्रेमाचं बंधन असतं
तुझ्या फुलांचा रंग कसा केशरी भगवा उग्र दिसतो
अगं वेडे रडू नकोस त्यातलीसुद्धा गंमत सांगतो
तुझ्याकडे पाहताना वैशाख वणवा मऊ भासतो.
आमच्या बागेतल्या गुलमोहोराला
हिवाळ्यातच पालवी फुटली;
डावीकडची एक फांदी
अचानकच बहरून आली !
लालकेशरी पिवळ्या फुलांनी
लगडून जडावून गेली.
भर दुपारच्या कडक उन्हाच्या
वेडी प्रेमातच पडली
आणि सकाळचा गारठा सहन न होऊन
दोन फुलं गळून गेली.
मग ती वेडी हळवी फांदी
हिरमुसुन रडत बसली
आणि कोपऱ्यातली मंद अबोली
केशरीसं फिकट हसली.
मुसमुसत फांदी म्हणाली
मी का नाही सदाफुली?
ती कशी सदा असते सुखावलेली
तशी मी का नाही फुललेली?
रस्त्यापल्याडचा वड अनुभवी खरखरला...
"अगं, प्रत्येकाचा वेगळा काळ असतो आपला.
मी नेहेमी हिरवा असतो
तरीसुद्धा भकास दिसतो
पारंब्यांच्या चरबट आयाळींनी लगडलेला
बारा महिने उभा असतो
वर्षातून एकदाच पुजला जातो
सावित्रीच्या कृपेनं...
जखडून जातो त्यादिवशी
पांढऱ्या धाग्यांच्या वेटोळ्यानं
त्यातसुद्धा सुख असतं
प्रेमाचं बंधन असतं
तुझ्या फुलांचा रंग कसा केशरी भगवा उग्र दिसतो
अगं वेडे रडू नकोस त्यातलीसुद्धा गंमत सांगतो
तुझ्याकडे पाहताना वैशाख वणवा मऊ भासतो.
3 Comments:
एका गहिवरल्या क्षणाला तुझ्या लिखाणाची सोबत होती...
तुझं सगळंच लेखन किती छान कोवळं आहे, बाळाच्या तळपायासारखं !
This comment has been removed by the author.
Post a Comment
<< Home